Ad will apear here
Next
ठाणे महानगरपालिकेचा वृक्षारोपण कार्यक्रम
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या एक लाख वृक्षारोपण कार्यक्रमाचा प्रारंभ राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यार हस्ते व महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत एक जुलै रोजी शीळ येथे करण्यात आला. 

महाराष्ट्र शासनाने वन विभागाच्या माध्यमातून एक ते सात जुलै या वन महोत्सवाच्या कालावधीत चार कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत ठाणे महानगरपालिकेने सन २०१७मध्ये एकूण तीन लाख रोपे लावण्याचे नियोजन केले  आहे. 

शीळ येथील खरीवली देवी मंदिराच्या डोंगराच्या पायथ्याशी चार हजार आणि  खरीवली देवी मंदिराच्या डोंगराच्या पाठीमागील भागात पन्नास हजार वृक्ष तसेच कौसा येथील मुंब्रा-बायपास दर्ग्यासमोरील डोंगरावर ४६ हजार रोपांची लागवड करण्यांत आली.  

कार्यक्रमाला आमदार सुभाष भोईर, रवींद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्केय विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक व शिवसेनेचे गटनेते दिलीप बारटक्के, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, उपायुक्त (मुख्यालय) संजय निपाणे, उपायुक्त ओमप्रकाश दिवटे, सहायक आयुक्त शंकर पाटोळे, अनुराधा बाबर, चारुशीला पंडित, दत्तात्रय देवरे, विजयकुमार जाधव, कार्मिक अधिकारी वर्षा दीक्षित, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील वर्षी कौसा येथे स्वतः लावलेल्या वडाच्या रोपाचा वाढदिवस साजरा केला. या रोपाच्या संगोपनाबद्दल समाधान व्यक्त करून, त्यांनी मागील दोन वर्षांत लावण्यात आलेल्या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी तेथील स्थानिक आदिवासी युवकांवर सोपवली. या युवकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. ठाणे महानगरपालिकेने आतापर्यंत केलेल्या वृक्षारोपणापैकी  ८५-९० टक्क्यांपेक्षा जास्त रोपे जगवली आहेत. महानगरपालिकेने केलेल्या या कार्याबद्दल पालकमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले.

या उपक्रमामध्ये महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी, शाळा, विविध सामाजिक संस्था, खासगी संस्था आणि स्वयंसेवक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. याकरिता ठाणे महानगरपालिकेमार्फत ठाणे व मुंब्रा रेल्वे स्थानकावरून मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZVCBE
Similar Posts
महावृक्षारोपण अभियानांतर्गत तीन लाख वृक्ष लागवडीचा ठाणे महानगरपालिकेचा संकल्प ठाणे : महाराष्ट्र सरकारने वन विभागाच्या माध्यमातून २०१७मध्ये एक जुलै ते सात जुलै या कालावधीत चार कोटी वृक्ष लावण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्याअंतर्गत ठाणे महानगरपालिकेच्या वतीने चालू वर्षात एकूण तीन लाख वृक्ष लागवड करण्याचे नियोजन केले असून, त्यापैकी दोन लाख वृक्ष वनविकास महामंडळ या तज्ज्ञ संस्थेकडून लावण्यात येणार आहेत
महावृक्षारोपण अभियानाअंतर्गत एक लक्ष वृक्ष लागवड ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने शिळ येथील खरीवली देवी मंदिरात महावृक्षारोपण अभियानाअंतर्गत एक लक्ष वृक्ष लागवडीच्या उपक्रमाचा शुभारंभ एक जुलै रोजी होणार आहे. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री, व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या
ठाण्यात उभा राहणार १०० फूट उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ ठाणे : ठाणे महानगरपालिका आणि डी. के. फ्लॅग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरामध्ये ३०.५ मीटर म्हणजेच १०० फूट उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यात येणार आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या ध्वजस्तंभाचे उद्घाटन होणार आहे
हरित सायकल प्रकल्पाचे उद्घाटन ठाणे : ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने पी. पी. पी. अंतर्गत ‘हरित सायकल प्रकल्पाचे’ उद्घाटन गुरुवारी, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता युवासेना प्रमुख   आदित्य ठाकरे यांच्या हस्ते, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language